पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) कॅबिनेट मंत्री शंभुराजे देसाई हे आज दुपारी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल झाले.यावेळी त्यांच्या बरोबर खासदार संदीपान भुमरे व राणाजगजितसिंह यावेळी उपस्थित होते.सगेसोयरे अंमलबजावणी साठी राज्य सरकार हे चर्चेसाठी तयार आहे.जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे.अशी विनंती शंभुराज देसाई यांनी यावेळी केली आहे.दरम्यान आज कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांची विनंती मान्य करून मी त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे.आज मी आता एक महिन्यासाठी उपोषण स्थगित करत आहे.असे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.आता सरकारला १३ जुलै असा एक महिन्याचा कालावधी दिला आहे.असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलताना शंभुराज देसाई हे म्हणाले की आम्ही सरकारच्या वतीने चर्चा करीता तयार आहे.उद्या सर्व अधिकारी यांची मी मिंटीग लावतो.सरकारला एक महिन्याचा कालावधी द्या.सगेसोय-यांच्या मुद्द्यावर लवकर तोडगा काढू.सगेसोयरे विरोधात सरकारची मानसिकता नाही.ओबीसी नेत्यांसोबत देखील सरकारच्या वतीने बोलणे सुरू आहे.आजपासून मराठा व ओबीसी यांच्यात काही दुरावा नाहीहे सगळे एकच आहेत.असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.व शंभुराज देसाई यांच्या हस्ते रस घेऊन उपोषण सोडले आहे.