पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल यावेळेस अनेकांना एकदम आश्र्चर्यचकित लागला आहे.अनेकजणांना वाटले होते की.भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास होता.पण आता एक नवीन अपडेट समोर आली आहे की.देशात आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत निकालावर चक्क सट्टाबाजी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.” फेअरप्ले” प्रकरणी चालू असलेल्या तपासात आज अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई व पुण्यात धाडी टाकल्या आहेत.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार प्रिव्हेशन ऑफ मनी लाॅंडरिंग कायदा (PMLA) अंतर्गत मुंबई आणि पुण्यातील एकूण १९ ठिकाणी ईडीच्या वतीने धाडी टाकून ईडीने रोकड व महागाडी घड्याळ बॅंक व डिमॅट खात्याची माहिती तसेच गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.या कारवाईत ईडीने एकूण ८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त तसेच गोठवल्याचा दावा यावेळी ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.यात आयपीएल सामन्यांचे अनधिकृत प्रक्षेपण व बिंटिंग प्रकरणी व लोकसभा निकालावर देखील सट्टाबाजी झाल्याचा दावा देखील ईडीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान फेअरप्ले अॅप प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.नोडल सायबर पोलिस मुंबई यांनी मेसर्स च्या तक्रारींवर नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून तपास केला जात आहे.फेअरप्ले स्पोर्ट एलएलसी आणि इतरांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूलचे नुकसान केल्याची तक्रार वायकाॅम १८ मिडिया प्रायव्हेट लिमिटेडने नोंदवली आहे.