पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सगेसोय-यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी करुन ते अंतरवाली सराटीत उपोषणला बसले आहेत.आज त्यांच्या उपोषणांचा सहावा दिवस आहे.काल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री यांचे स्विव सहाय्यक मंगेश चिवटे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.त्यानंतर आज राज्य सरकार च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळा मधील दोन कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई व तानाजी सावंत हे आज दुपारी तातडीने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल होत आहेत.त्यांच्या भेटीत आता काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील म्हणाले की आता मी सकारात्मक आहे.जर राज्य सरकारच्या वतीने सगेसोय-यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी तातडीने निर्णय न घेतल्यास मी माझा निर्णय घेईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.तसेच मी सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे.पण राज्य सरकार आरक्षणाचा विषय निर्णय तडीस नेणार आहे की नाही? हा प्रश्न देखील म्हत्वाचा आहे.असेही ते म्हणाले.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यां विषयी चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारच्या वतीने दोन कॅबिनेट मंत्री मंत्री यांचे शिष्टमंडळ येणार आहे.दरम्यान यापूर्वीच मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकारच्या वतीने टाळाटाळ केल्यास मराठा समाजाच्या वतीने विधानसभेच्या २८८ जागा लढविणार असे यापूर्वीच जाहीर केले आहे.