Home क्राईम भोसरीतील मोशीत भरघाव कारने महिलेला उडविणारा कार चालक हा भोसरी पोलिस स्टेशन...

    भोसरीतील मोशीत भरघाव कारने महिलेला उडविणारा कार चालक हा भोसरी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या हवालदाराचा मुलगा

    1130
    0

    पिंपरी -चिंचवड १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या भोसरीतील मोशी याठिकाणी असलेल्या चौकात भरघाव वेगाने येणाऱ्या वॅगनार कारने रस्ता ओलांडणां-या महिलेला उडवले हा अपघात एवढा भीषण होता की ही महिला हावेत उडून जोरात खाली पडली व गंभीर रित्या जखमी झाली तसा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान यावेळी ही वॅगनार कार भोसरी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलिस हवालदार चालवत असल्याचे समोर आले आहे.एवढा भीषण अपघात होऊन व २४ तास उलटून सुध्दा पोलिसांनी 👮 त्वरीत कारवाई का केली नाही.यांचे कोडे आता सुटले आहे.या निमित्ताने पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा आणखी एक मोठा ‘कार ‘ नामा आता समोर आला आहे.

    दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.सदरच्या अपघातात कार चालक विनय नाईकरे असे वॅगनार कार चालक आरोपीचे नाव आहे.तो भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलिस हवालदार विलास नाईकरे यांचा मुलगा आहे.आता याच पोलिस स्टेशन मध्ये हवा मुलगा विनयला खावी लागणार आहे.दरम्यान या सर्वा घडामोडी नंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या पिंपरी -चिंचवड कार्यक्षेत्रात येणाऱ्या या पोलिसांचे सध्या काय उद्योग सुरू आहेत.नेमकं कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे का ? हा एक गंभीर प्रश्न आता सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.दरम्यान या अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या महिलेचा फिर्यादी पतीला देखील धमकविले अशी माहिती देखील पुढे येत आहे.दरम्यान या जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर व अपघाताचे सीसीटीव्हीचे फुटेज पुढे आले व आधी फिर्यादीची यापूर्वी भोसरी पोलिसांनी फिर्याद घेण्यात टाळाटाळ केली व आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला गेला होता.या अपघाताचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झाल्यानंतर अखेर भोसरी पोलिसांना जाग आली व पोलिस हवालदारचा मुलगा याच्यवर २४ तासांनी गुन्हा दाखल करुन अखेर त्याला अटक केली आहे.दरम्यान पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात व ‘ हिट अँड रन ‘ हे प्रकरण समोर असताना देखील पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालय मधील पोलिस हे हवालदाराच्या मुलाला वाचवण्या साठी मोठ्या प्रमाणावर प्रर्यत्न करत होते.हे आता चित्र एकंदरीत स्पष्ट होते.असे दिसत आहे.पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा वचक त्यांच्याच कर्मचारी यांच्यावर आता राहिला नाही का ? असे एक नव्हेतर अनेक प्रश्न या अपघाताच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहे. यात अपघातग्रस्त महिलेच्या पतीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या व त्यालाच धमकविणां-या पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर आता पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे हे काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.

    .

    Previous articleमुंबई व पुण्यासह १९ ठिकाणी आज ईडीची छापेमारी, लोकसभा निवडणूक निकालांशी सट्टा बाजी कनेक्शन उघड
    Next articleमिनी बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १० ठार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here