पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)आज उपोषण सोडल्या नंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सायंकाळी उपचारा करीता छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दखल करण्यात आले आहे.मागील सहा दिवसांपासून ते अंतरवाली सराटी येथे उपोषण करत होते.त्यांची प्रकृती खालावली होती.आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढला.जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा कालावधी मागण्यां साठी वेळ दिला आहे.दरम्यान एक महिन्याच्या आत मागण्या मान्य नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात २८८ जागांवर विधानसभेचे निवडणूका लढवण्याचा इशारा मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.