पुणे दिनांक १५ जून ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिनांक १८ जून रोजी मंत्रालयात बैठक बोलावली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे. दरम्यान सगेसोय-यांची अंमलबजावणी व जुन्या कुणबीच्या नोंदी या करिता मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतर वली सराटीत उपोषण सुरू केले होते.
दरम्यान उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या कडे सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी मंत्री शंभू राजे देसाई यांनी अंतरवली सराटीत दाखल झाले होते. व त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर मनोज पाटील यांनी सरकारला एक महिन्यांची मुदत दिली होती. त्या नंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शंभूराजे देसाई यांच्या हस्ते उपोषण सोडले होते. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत सगेसोय-यांची अंमलबजावणी व जुन्या कुणबी नोंदी बाबतचा अहवाल मंत्री शंभूराजे देसाई हे अहवाल मांडणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.