Home क्राईम पुणे क्राइम ब्रॅचच्या पोलिसांनी पुण्यातील न-हे येथील कारखान्यांवर छापेमारी करून १कोटी ३९...

    पुणे क्राइम ब्रॅचच्या पोलिसांनी पुण्यातील न-हे येथील कारखान्यांवर छापेमारी करून १कोटी ३९ लाखाचा गुटखा जप्त

    660
    0

    पुणे दिनांक १६ जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुण्यातील न-हे भागात १ कोटी ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सदरच्या छाप्यात एकूण २५० ते ३०० गुटख्याची पोती जप्त करण्यात आली आहे. दरम्यान एकाच ठिकाणी हा कारखाना सुरू होता. व गोडाऊन वर पुणे क्राइम ब्रॅचच्या पोलिसांनी छापेमारी केली आहे.या कारवाईत चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान सदरच्या छापेमारी बाबत पोलिस सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील न-हे येथील कारखान्यात तयार होणारा गुटखा हा नाशिक अहमदनगर व सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री करीता पाठविला जात असत  दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारखाना मधील गुटखा बनवण्यासाठी असलेली साधन सामुग्री देखील जप्त करण्यात आली आहे. पुणे क्राइम ब्रॅचच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुटखा विक्री व उत्पादन करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणून पोलिसांनी एकूण चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची नावे १) पुष्पेंद्र सिंग. २) सुनिल सिंग. ३) मुकेश गेहलोत ४) चंदन सिंग अशी आहेत. तर यांचा अन्य एक साथिदार निलेश ललवाणी हा फरार आहे. 👮पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

    Previous articleजुन्या पुणे ते मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा
    Next articleनागपूरात भीषण अपघात ट्रॅव्हल्स बसने रिक्षाला चिरडल्याने दोन जवानांचा मृत्यू अन्य सहा जवान जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here