Home क्राईम जुन्या पुणे ते मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाहनांच्या दोन किलोमीटर...

    जुन्या पुणे ते मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा

    640
    0

    पुणे दिनांक १६ जून ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जुन्या पुणे ते मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या रांगा तब्बल दोन किलोमीटर प्रर्यत रांगाच रांग लागल्या आहेत. दरम्यान या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्या मुळे वाहन चालक हे त्रस्त झाले आहेत. आज रविवार असल्याने अनेक नागरिक हे पुण्यावरुन मुंबई कडे तर काहीजण मुंबई कडून पुण्याकडे येत असतात  दरम्यान पुणे ग्रामीण लोणावळा 👮पोलिस हे सदरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

    दरम्यान वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्या करिता लोणावळ्यात पोलिसांनी एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. दरम्यान पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक नागरिक हे लोणावळ्यात धबधबा पाहण्यासाठी व पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर बसतो. तसेच पर्यटनासाठी आले ल्या नागरिकांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. दरम्यान यावर उपाय योजना म्हणून लोणावळ्यात ग्रामीण पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू केली आहे. दरम्यान आज रविवार असल्याने अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने  पुणे ते मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. व दोन किलोमीटर प्रर्यत वाहनांच्या रांगाच रांग लागल्या आहेत.

    Previous articleमुंबईसह महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हवामान खात्याच्या अंदाज
    Next articleपुणे क्राइम ब्रॅचच्या पोलिसांनी पुण्यातील न-हे येथील कारखान्यांवर छापेमारी करून १कोटी ३९ लाखाचा गुटखा जप्त

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here