पुणे दिनांक १८ जून ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील सह्याद्री हाॅस्पीटलसह अन्य एकूण ६० ते ७० हाॅस्पीटलमध्ये बाॅम्ब ठेवलाय असा धमकीचा ई- मेल अज्ञात व्यक्तींने पावल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी तातडीने डेक्कन भागातील सह्याद्री हाॅस्पीटलमध्ये बाॅम्ब शोधक पथकासह धाव घेऊन या हाॅस्पीटलची संपूर्ण तपासणी केली असता कुठेही बाॅम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. असं आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. दरम्यान हाॅस्पीटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा हा खोडसाळपणा कोणी केला? पुणे 👮पोलिस करत आहेत. तरी देखील खबरदारी म्हणून या हाॅस्पीटल मध्ये पुणे पोलिसांचे पथक हे ठाणे मांडून बसले आहे.
दरम्यान ज्या ई-मेल वरुन हाॅस्पीटलला धमकी आली त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम पुणे पोलिसांची यंत्रणा काम करत आहे. दरम्यान पुणे शहरातील डेक्कन भागातील सह्याद्री हाॅस्पीटल मध्ये त्यांच्या ई-मेलवर सोमवारी दिनांक १७ जून रोजी एका अज्ञात व्यक्तींने हाॅस्पीटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठवला होता. दरम्यान या ई-मेल नंतर हाॅस्पीटलमधील कर्मचारी चांगलेच घाबरले होते. त्यांनी या घटनेची माहिती पुणे पोलिसांना दिली त्यानंतर पोलिस हे बाॅम्ब शोधक पथकासह तातडीने या हाॅस्पीटलमध्ये पोहचले व या हाॅस्पीटल ची संपूर्ण तपासणी केली असता कुठेही बाॅम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. तसेच धमकीचा ई-मेल देणाऱ्या व्यक्तीने एकाचवेळी पुणे शहरातील एकूण ६० ते ७० हाॅस्पीटलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल पाठवले होते.