पुणे दिनांक २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात व देशात आता असे दिसायला लागले आहे की भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यांच्या बद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातील विश्र्वासाला तडा गेला आहे.आता मोदींच्या गॅरंटीवर लोकाचा आता विश्र्वास नाहिये.हे आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी खोटी निघाली.अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व जेष्ठ नेते शरद पवार यांनी टिका केली आहे.लोकसभा निवडणूकीतील निकाला नंतर भाजपची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे.व केंद्रात देखील त्यांना स्वबळावर सत्ता मिळवता आली नसून एनडीएचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही सरकारचे चांगलेच 👂 कान टोचण्यात आले आहे.
दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीला चांगली मतं आणि जागा मिळाल्या आहेत.या बदल पवार यांना माध्यमांनी प्रश्र्न विचारला असता पवार यांनी म्हटले की.आता लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरकार वर विश्वास राहिलेला नाही.असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.मोदी यांनी जी आश्र्वासन दिली होती ती गेल्या ५ ते १० वर्षात त्यांनी पाळली नाहीत.हे आता लोकांच्या लक्षात आले आहे.आणी आता लोकांना बदल हवाय. त्यामुळेच राज्यात लोकसभा निवडणूकीत राज्यात हे चित्र दिसले आहे.असे पवार म्हणाले.या लोकसभा निवडणूकीत तुम्ही बघितले असेल राज्यात आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने ३१ जागा जिंकल्या आहेत.आम्हाला १५५ विधानसभा मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे.व आमचा विजय झाला आहे.याचाच अर्थ भविष्यात विधानसभा निवडणुकीत लोकांचा मूड काय हे स्पष्ट होतं.व त्याच दुष्टीने पावलं टाकणं ही आमची जबाबदारी आहे.असे देखील ते म्हणाले आहेत.