पुणे दिनांक २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे.दरम्यान कथीत दारु घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. आज गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.या पूर्वी सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.दरम्यान २जून रोजी आत्मसमर्पण केल्या नंतर ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले होते.त्यांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात जामीना करीता अर्ज केला होता.त्यानंतर त्यांना आज दिलासा मिळाला आहे.
दरम्यान ट्रायल कोर्टाचे न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या कोर्टाने त्यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.दरम्यान या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे याकरिता जामीनपात्रावर स्वाक्षरी करण्यासाठी ४८ तासांचा अवधी द्यावा.अशी विनंती ईडीने ट्रायल कोर्टाला केली आहे.मात्र या आदेशाला स्थगिती दिली जाणार नाही.असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.यावेळी ट्रायल कोर्टाने सांगितले की.जामीनपत्र उद्या न्यायाधीशांसमोर सादर केले जाईल केजरीवाल उद्या शुक्रवारी तुरुंगातून बाहेर येऊ शकतात दरम्यान केजरीवाल यांच्या सुटकेआधी ईडी सुप्रीम कोर्टात जाऊन ट्रायल कोर्टाचा आदेशाला स्थगिती मागू शकते असं बोललं जात आहे.दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मनी लाॅंड्रिंग प्रकरणात २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.