Home राजकीय नाना पटोलेंनी केली अटल सेतूची पाहणी,पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार मुद्दा

  नाना पटोलेंनी केली अटल सेतूची पाहणी,पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार मुद्दा

  679
  0

  पुणे दिनांक २१ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अटलसेतूची आज पहाणी केली.तसेच लाईव्ह व्हिडिओ करून अटल सेतूवरील भेगा दाखवल्या आहेत.सदरच्या भेगा ह्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत.यात एक फुटाचा गॅप आहे.या अटल सेतूच्या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा या मागचा उद्देश आहे.सर्व सामन्य नागरिकांच्या जिवाशी हा खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला,असं नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.

  दरम्यान या प्रकरणी आपण येत्या पावसाळी अधिवेशनात हा अटल सेतूचा मुद्दा उपस्थित करणार असे देखील नाना पटोले यांनी सांगितले आहे.दरम्यान या अटल सेतूचे कामकाज होऊन तीन महिने झाले आहेत.याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.पंरतू तीन महिन्यांत या अटल सेतू पुलावर मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.१०० ते १५० फुट परीसरात मोठ्या भेगा पडून तडे गेले आहेत.सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे.या कामा संदर्भात आता शंका उपस्थित झाल्या आहेत.

  Previous articleमहाबळेश्वर मधील वादग्रस्त वाधवान हाऊस मध्ये मुख्यमंत्रीचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व सलमान खानची भेट
  Next articleमुंबईतील बांद्रा येथील रिझवी काॅलेच्या रायगड येथे पर्यटनासाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांचा धबधब्यात बुडून मृत्यू

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here