Home Breaking News मुंबईतील बांद्रा येथील रिझवी काॅलेच्या रायगड येथे पर्यटनासाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांचा धबधब्यात...

मुंबईतील बांद्रा येथील रिझवी काॅलेच्या रायगड येथे पर्यटनासाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांचा धबधब्यात बुडून मृत्यू

536
0

पुणे दिनांक २१ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार रायगड येथे पावसळी पर्यटनासाठी मुंबईतील बांद्रा येथील रिझवी काॅलेचे विद्यार्थी आले होते.हे विद्यार्थी खालापूर येथील वावर्ले येथील पोखरवाडीतील सत्यसाईबाबा बंधा-यांवरील धबधब्यावर गेले असता यातील चार विद्यार्थ्यांचा या धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे तर अन्य विद्यार्थ्यांना तेथील स्थानिक ग्रामस्थांनी वाचवलं आहे.अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान या धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्या चार जणांचे नावे १) एकलव्य सिंग.२) ईशांत यादव ३)आकाश माने ४) रमत बंडा असे आहेत.तर या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील बांद्रा मधील रिझवी काॅलेचे ३७ विद्यार्थी व विद्यार्थिनी हे बसने रायगड येथे पावसाळी पर्यटन साठी आले होते. आज खालापूर तालुक्यातील वावर्ले गावाच्या पोखरवाडी सत्यसाईबाबा बंधा-यांवरील धबधब्यावर बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य विद्यार्थ्यांना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवलं आहे.

Previous articleनाना पटोलेंनी केली अटल सेतूची पाहणी,पावसाळी अधिवेशनात उपस्थित करणार मुद्दा
Next articleपुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी, अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here