पुणे दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ओबीसी आंदोलनासाठी छगन भुजबळच रसद पुरवत आहे.त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन,असा इशारा मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे.यावेळी ते म्हणाले की ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत,तो येवलावाला काड्या करत आहे.प्रा.लक्ष्मण हाके यांना भुजबळ यांनीच उभे केले आहे.मराठा नेत्यांनी आतातरी जागे व्हावे.मराठ्याच्या हक्काच्या नोंदी रद्द करा,अशी मागणी आता करत आहेत.असेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की.मी करिअर संपवण्याचा धमकीला घाबरत नाही,मी घरी बसलो तरी ओबीसी समाजासाठी रस्त्यावर लढत राहिन,असा पलटवार त्यांनी यावेळी केला आहे.मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे,मग माझ्या आमदार कीचे काय घेऊन बसलात.माझे राजकीय करिअर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे.जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ आहे,असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.दरम्यान छगन भुजबळ यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन,असा इशारा मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.