पुणे दिनांक २२जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे.ते काल बीड दै-यावर गेले होते पण त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते पुन्हा रुग्णालयात उपचारा करीता दाखल झाले आहेत.त्यांची डॉक्टरांकडून आता त्यांची तपासणी केली जात आहे.दरम्यान उपोषणा नंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.व सहा दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.पण कमरेला झटका बसल्यानंतर ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.
दरम्यान आज सायंकाळी अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांच्या हृदयाला ताण येऊन ह्दय धडधडत असल्याचं त्यांनी डॉक्टर यांना सांगितल्यावर त्यांच्यावर टुडी इको.ईसीजी व सोनोग्राफी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या आहेत तसेच त्यांना पुन्हा सलाईन लावले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.