पुणे दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नुकत्याच झालेल्या नीट -यूजीच्या निकालावरुन वाद सुरू आहे.तसेच यूजीसी-नेटचा पेपर लीक झाल्या मुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे.तसेच या बाबत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाली त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने पेपर लीक विरोधी कायदा काल मध्यरात्री पासून शुक्रवारी २१ जून २०२४ पासून लागू करण्यात आला आहे.
दरम्यान यूजीसी-नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आल्या नंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात भारतभर आंदोलन केले होते. दरम्यान पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काल मोठे पाऊल उचलले असून पेपर लीक झाल्यास आरोपीला ३ ते ५ वर्षांची शिक्षा होणार आहे.तसेच १० लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.याच बरोबर या कायद्यामध्ये इतर काही कठोर तरतुदी आहेत.दरम्यान केंद्र सरकारचा निर्णय गॅझेट मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.