पुणे दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्याच्या सांस्कृतिक शहरात होतंय ड्रग्स विक्री पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका नामांकित हाॅटेल मध्ये पार्टीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्टीत ड्रग्स अल्पवयीन मुलांना दारु व ड्रग्स दिले गेल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान पुण्यातील सर्वच हाॅटेल मध्ये शनिवारी व रविवारी प्रायव्हेट पार्टी पहाटे प्रर्यत सुरू असताना दिसतात पण पुणे पोलिस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे एकंदरीत दिसत आहे.तर राज्याची संस्कृती बनली ड्रग्स संस्कृती,?
दरम्यान याबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत तसेच यांची चौकशी करून कारवाई करु प्रत्येक घटनेवर मंत्र्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे.पुण्यातील प्रकार गंभीर आहे.असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे.तर पुण्याचे काॅग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की पुण्यात सर्वच हाॅटेलमध्ये रात्रीच्या वेळेस पार्टी पहाटे प्रर्यत चालतात या पार्टीवर पुणे पोलिसांचा वचक राहिलेला नाही.यात मोठ्या प्रमाणावर अर्थकारण होते.त्यामुळे दारुबंदी खात्याचे कर्मचारी व पोलिस यांचा या हाॅटेल चालकांना एकप्रकारे मदत केली जाते .अशा घटनां मुळे पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणून असलेली ओळख आता राहीलेली नाही असे ते म्हणाले व पुण्यातील या घटनेबाबत पावसाळी अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहे.असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.दरम्यान पुण्यातील कल्याणी नगर येथील घटनेनंतर देखील पुण्यातील हॉटेल्स मध्ये रात्रीच्या वेळेस अल्पवयीन मुलांना दारु व ड्रग्स दिले जात आहे.हे सर्व गंभीर प्रकरण आहे.अशा घटनेनंतर पुण्यात आणखी एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.असेच म्हणाले तर वावगे ठरू नये.