पुणे दिनांक २४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मोठी अपडेट आली असून पुणे येथील फर्ग्युसन रोडवरील ‘ एल ३-लिक्विड लीजर लाउंज ‘ पब बार रविवारी रात्री पहाटे प्रर्यत सुरू होता या पबमध्ये काही युवक हे अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर ही बाब सर्वच माध्यमांनी बाब समोर आणल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले.या पब प्रकरणी पुणे पोलिसांनी एकूण आठ जणांन विरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या पुणे ड्रग्ज प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील या दोघांना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.दरम्यान या दोघांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.व ही कारवाई केली आहे.दरम्यान या प्रकरणी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली होती की ही घटना पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारी घटना आहे.व या संदर्भात त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून या संबंधीत पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.दरम्यान या प्रकरणी काल दोन बीट मार्शल यांचे निलंबन केले होते.आता कारवाई करण्यात आलेल्यांची संख्या चार झाली आहे.