Home Breaking News पुण्यातील माॅलच्या टाॅयलेट मध्ये दोन तरुणी ड्रग्स ओढतानांचा व्हिडिओ व्हायरल,’पुणे नगरी झाली...

पुण्यातील माॅलच्या टाॅयलेट मध्ये दोन तरुणी ड्रग्स ओढतानांचा व्हिडिओ व्हायरल,’पुणे नगरी झाली ड्रग्स नगरी?

311
0

पुणे दिनांक २४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ‘एल३-लिक्विड लीजर लाउंज ‘चे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओ मध्ये दोन तरुणी या माॅलच्या टाॅयलेट मध्ये ड्रग्स सेवन करताना दिसत आहे.दरम्यान सदरचा व्हिडिओ हा पुणे ते नगर रोडवरील फोनिक्स माॅलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान आता हा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर ‘पुणे नगरी ही ड्रग्सची नगरी झाली असे म्हणले तर वावगे ठरणार नाही?

दरम्यान पुण्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस हाॅटेल पहाटे प्रर्यत सुरू असताना दिसत आहे.तर पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातात दोन आयटी इंजिनियर यांचा मृत्यू होऊन देखील यांचा धडा पुण्यातील काही लोकांनी घेतला नाही.दरम्यान त्यावेळी पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्कच्या खात्यांनी काही काळापुरती कारवाई केली.खरे पण त्यानंतर पुन्हा एकदा बार व पब पहाटे प्रर्यत सुरू आहे.हे पुन्हा एकदा काल फर्ग्युसन येथील पब हा पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होता . यावरून आता सिद्ध झाले आहे.यात हे बार शनिवारी व रविवारी या दिवशी पार्टी आयोजित करण्यात येते त्यामुळे हे पब बार पहाटे प्रर्यत सुरू असताना दिसत आहे.आता पुणे नगर रोडवरील माॅल मधील टाॅयलेट मध्ये बसून दोन तरुणी या ड्रग्सचे सेवन करताना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.आता याप्रकरणी पुणे पोलिस काय कारवाई करणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous articleपुण्यातील ड्रग्स प्रकरणाती ८ आरोपींना २९ जून पर्यंत पोलिस कस्टडी
Next articleभारताने २४ धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here