पुणे दिनांक २५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.जामीन दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.दरम्यान अल्पवयीन मुलाची आत्या पुजा जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यावर आज न्यायालयाने निकाल दिला आहे.तसेच या मुलांचा ताबा आत्याकडे देण्याचा आदेश यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान अल्पवयीन मुलाची आत्या पुजा जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.दरम्यान ही याचिका न्यायालयाने मान्य केली आहे.कायद्या नुसार कोणत्याही अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर रित्या ताब्यात घेता येत नाही.यावर याचिका दाखल करण्यात आली होती.अल्पवयीन आरोपीच्या वतीने वकील प्रशांत पाटील यांनी न्यायालयात सांगितले त्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन मुलाला मुक्त करण्याचे आदेश दिले.दरम्यान दिनांक २२ मे.५ जून व १२ जून २०२४ रोजीचे जे आदेश आहेत त्यात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते.ते बेकायदेशीर आहे.असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.यावेळी वकिलांनी सांगितले बालन्याय मंडाळाने जामीन मंजूर केल्यानंतर पोलिसांनी 👮 आदेश दुरुस्ती साठी अर्ज करणे आणि त्या अर्जावर मंडाळाने सुधारगृहाच्या कोठडीचा आदेश दिल्याने पोलिसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेणे हे बेकायदा.असे उच्च न्यायालयाने याचिकेवर निर्णय देताना स्पष्ट केले आहे.व या अल्पवयीन मुलाचा ताबा त्याची आत्या पुजा जैन यांच्याकडे देण्यात यावा असे निकालात म्हटले आहे.