पुणे दिनांक २५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारताने आज झालेल्या टी -२० वर्ल्डकप मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा २४ धावांनी पराभव केला आहे. व सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान भारत संघ पाचव्या वेळेस या स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पोहोचला आहे.तसेच टीम इंडियाने आज मागील श्रीलंकेचे रेकॉर्ड देखील मोडला आहे. भारत आज टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला आहे.दरम्यान श्रीलंकेच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक ३३ विजायांची नोंद आहे.दरम्यान प्रथम फलंदाजी करतान भारताने ऑस्ट्रेलिया समोर २०६ धावांचे आव्हान ठेवले होते.याला प्रत्यूत्तर देताना ऑस्ट्रेलिया संघ केवळ १८१ धावा करु शकला आहे.त्यामुळे भारत आता सेमीफायनल मध्ये पोहोचला आहे.आता भारताचा इंग्लंड बरोबर सामना होणार आहे.दरम्यान रोहित शर्माने ४१ चेंडूत ९२ धावांची खेळी केली आहे . तर टीम इंडियाच्या वतीने २० षटकात ५ विकेट गमावून २०५ धावा केल्या आहेत.