Home Breaking News उध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहताना एकत्र

उध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहताना एकत्र

610
0

पुणे दिनांक २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधीमंडळाच्या लिफ्टची वाट पाहताना एकत्र फोटो मध्ये दिसत आहे. व ते एकाच लिफ्ट मध्ये विधीमंडळात पोहोचले.तसेच उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात विधानभवनात उध्दव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना अॅडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिल्या व त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चाॅकलेट दिले.त्यामुळे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे व भाजप पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चाने जोर धरला आहे.

Previous articleमुंबई ते पुणे महामार्गावर लुटमार करणारी टोळी गजाआड,पावने सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा उद्या राज्याचा अर्थसंकल्प, महिलांना १५००रुपये मिळणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here