Home क्राईम चंद्रपूर येथील कै.बाबा आमटेंच्या आनंदवनात २५ वर्षीय युवतीची हत्या? एकच खळबळ

  चंद्रपूर येथील कै.बाबा आमटेंच्या आनंदवनात २५ वर्षीय युवतीची हत्या? एकच खळबळ

  334
  0

  पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील कै.बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील प्रकल्पातील पुनर्वसित दिवांग यांच्या वसाहतीत राहणां-या आरती चंद्रवंशी ( वय २५  ) असे खून झालेल्या युवतीचे नाव असून तिचे आई वडील हे उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते.ते रात्री उशिरा घरी पोहोचले असता आरती ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तिच्या गळ्यात घाव लागलेले दिसून आले.तिचा मृत्यू झाला होता.

  दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरती ही घटस्फोटीत असून ती तिच्या आई वडिलांसोबत राहत होती.दरम्यान याप्रकरणी वरोरा पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान सामाजिक काम करणाऱ्या आश्रमात २५ वर्षीय युवतीचा खून होणे ही धक्कादायक बाब आहे.या घटनेनंतर या आश्रमात एकच खळबळ उडाली आहे.असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

  Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा उद्या राज्याचा अर्थसंकल्प, महिलांना १५००रुपये मिळणार?
  Next articleउल्हासनगर व ठाण्यात अनधिकृत डान्सबारवर महानगरपालिकेची बुलडोझर कारवाई

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here