Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा उद्या राज्याचा अर्थसंकल्प, महिलांना १५००रुपये मिळणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा उद्या राज्याचा अर्थसंकल्प, महिलांना १५००रुपये मिळणार?

522
0

पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवार पासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.उद्या एकनाथ शिंदे सरकार दिनांक २८ जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असून अर्थ मंत्री अजित पवार हा अर्थ संकल्प सादर करतील या अर्थ संकल्पा मध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.त्यापैकीच एक लोकप्रिय घोषणा म्हणजे लाडकी बहिण योजना तसेच मुलींना पदवीपर्यंत शिक्षण मोफत देण्याची त्यामुळे उद्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष २०२३ ते २४ चार महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या अधिवेशनात महायुती सरकार कडून अनेक म्हत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी सरकारच्या शेवटच्या होणा-या अधिवेशनात राज्य सरकार महिला मतदार यांना आकृष्ट करण्यासाठी मध्यप्रदेशातील ‘लाडली बहन ‘ या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवी योजना सुरू करु शकते.या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यांवर प्रत्येकी १ हजार ५०० रुपये जमा होतात.उद्याच्या अर्थसंकल्पात यांची घोषणा होऊ शकते.तसेच आज सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पायरीवर शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पाहिजे अशा घोषणा दिल्या आहेत.तसेच सर्व विरोधी पक्षनेते हे शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी हाऊस मध्ये आवाज उठवणार असून याचा देखील अर्थसंकल्पात विचार होऊ शकतो.

Previous articleउध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहताना एकत्र
Next articleचंद्रपूर येथील कै.बाबा आमटेंच्या आनंदवनात २५ वर्षीय युवतीची हत्या? एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here