पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवार दिनांक २७ जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.उद्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे शुक्रवारी दिनांक २८ जून रोजी विधीमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार आहे.दरम्यान त्यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात टेन्शन वाढले आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची निवडणूक सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या निवडणुकीपूर्वीच आज विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जेष्ठ नेते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अजित पवार यांच्या गटातील ५ ते ६ आमदारांनी भेट घेतली आहे. ही भेट विधानभवनाच्या एका खोलीत झाली आहे.या मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी भेट घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान अजित पवार गटाचे आमदार हे जेष्ठ नेते शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत का? आता या चर्चांचे गु-हाळ सुरू झाले आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील काही आमदारांनी आमच्या बरोबर संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच केला होता.