पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका भाजपाच्या समन्वयक बैठकीत चार दिवसांपूर्वी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.या बैठकीत चौधरी यांनी वक्तव्य केले होते की.अजित पवार हे सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको.पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना आमच्या मानगुटीवर बसवले आहे.त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे.असे ते या बैठकीत म्हणले होते.त्यांच्या या विधानामुळे महायुती मधील वाद मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान चौधरी यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुती मध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू झाला आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे आता चांगलेच आक्रमक झाले असून ते पुणे बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांनी भाजपचे उपाध्यक्ष व बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांना काळे फासण्याची घोषणा केली आहे.दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी चांगलेच आक्रमक झाल्याने आता पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलाच वाद सुरू झाला आहे.