पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनाधिकृत लेडीज बार व पबवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका व पोलिस आयुक्त यांना दिल्यानंतर आज आज उल्हास नगर येथील अनाधिकृत डान्सबार ऍपल व एंजल या दोन बारवर महानगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान आज सकाळी पासून ही धडक मोहीम महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे.या शहरातील अनेक डान्सबार हे पहाटे प्रर्यत सुरू राहत होते.अशी माहिती मिळाल्यानंतर या डान्सबार ही कारवाई करण्यात आली आहे
दरम्यान उल्हासनगर व ठाण्यात अनेक ठिकाणी डान्स बार हे पहाटे प्रर्यत सुरू राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे व उल्हासनगरमधील या डान्सबार कारवाई करण्याचे आदेश दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्त व पोलिस आयुक्त यांना दिल्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान यापूर्वी देखील या लेडीज बारवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली होती.तरी देखील पून्हा हे लेडीज बार सुरू करण्यात आले होते.व हे लेडीज बार पहाटे प्रर्यत सुरू होते.हे पाहायला मिळत होते.पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशावरून महानगरपालिकेच्या वतीने या अनाधिकृत बारवर आज कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे आता या भागातील छमछम बंद होणार आहे.तसेच आजच्या कारवाई मुळे लेडीज बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील ‘एल३-लिक्विड लीजर लाउंज या पबमधील टाॅयलेट मध्ये दोन युवक हे ड्रग्सचे सेवन करताना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त व महानगरपालिकेच्या आयुक्तांना अशा पब व परमीटरुम हाॅटेलवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर पुणे महापालिकेच्या वतीने ‘एल ३-लिक्डिड लीजर लाउंज’ या पबवर तसेच पाषाण सूस रोड तसेच पौडच्या हाद्दीतील पब व परमीटरुम हाॅटेलवर कारवाई करण्यात आली आहे.