पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सगेसोय-यांच्या अधिसूचने बाबत आज म्हत्वाची सुनावणी होणार आहे.दरम्यान या बाबत आज राज्य सरकार न्यायालयासमोर मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका मांडणार आहे. दरम्यान सगेसोयरेच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्या पार्श्वभूमीवर आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून.मराठा आरक्षण संदर्भात विरोधीपक्षनेते सरकारला या संदर्भात हाऊस मध्ये प्रश्न विचारणार आहे.