Home Breaking News ओबीसी विरुद्ध मराठा वाद चिघळला, मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात दगडफेक...

ओबीसी विरुद्ध मराठा वाद चिघळला, मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात दगडफेक दोन्ही बाजूंच्या लोकांची डोके फुटले गावात तणावाचे वातावरण

331
0

पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावात दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जात असलेली वाहने अडवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तातडीने दखल झाले आहे.यामुळे पुन्हा ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आता उफाळून आला आहे. बीड जिल्ह्यातील मातोरी गावात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.या गावात दोन समाजा चे दोन गट आता आमनेसामने आले आहेत.दगडफेक मध्ये अनेक दुचाकी फुटल्या आहेत.तसेच या दगड फेकीत डिजेचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सध्या मातोरी गावाच्या आजुबाजुने मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत.या परीसरात सद्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज ओबीसी आरक्षण साठी उपोषणला बसलेले उपोषण कर्ते लक्ष्मण हाके आज भगवान गडावर जाणारी होते. त्यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी माळेगाव पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ हे बीजे लावून पाडळशिंगीकडे निघाले होते.त्यांनी आणलेल्या बीजे वर मातोरीत आल्यानंतर दोन गाणे वाजवले .काही कार्यकर्त्यांनी इथे एका समाजाच्या विरोधात घोषणा बाजी केली.त्यामुळे दुसऱ्या बाजूने मातोरी गावातील ग्रामस्थांनी यावेळी डीजे बंद करून गावातून जाण्यास सांगितले.मात्र यावेळी मातोरी गावातील ग्रामस्थ व हाके यांना आणण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली व पर्यायाने दोन्ही गटात या वेळी प्रचंड प्रमाणावर एकमेकांच्या दिशेने दगडफेक झाली या दगडफेकीत अनेकांची डोके फुटली आहेत. तर या दगडफेकीत वीजेचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच ४ ते ५ दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान ही घटना समजताच आजुबाजुच्या अनेक गावातील लोकांनी मातोरी गावाला चोहोबाजूंनी घेरलेले आहे.त्या मुळे या गावात प्रचंड प्रमाणावर लोक जमलेले आहेत . दरम्यान पोलिसांनी 👮 जास्तीचे पथक मागवून तातडीने मातोरी गावात धाव घेतली असून आता या गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांच्या गटातील आमदारांची एका खोलीत जयंत पाटील यांच्या बरोबर चर्चा, अजित पवार गटाचे टेन्शन वाढले
Next articleभारताचा ६८ धावांनी इंग्लंडवर विजय , फायनल मध्ये धडक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here