पुणे दिनांक २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्य सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असून काल गुरुवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.दरम्यान सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील म्हणून हा आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास उपाययोजना आखल्या आहेत.
दरम्यान त्यांपैकीच एक घोषणा म्हणजे लाडकी बहिण योजना आणि मुलींना पदवीपर्यंत शिक्षण मोफत देण्याची योजना.त्यामुळे आज काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान काल पासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले त्याचवेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष २०२३ व २४ चार महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे.दरम्यान यि अधिवेशनात विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.दरम्यान या विरोधकांच्या मागणीवर आज राज्य सरकार काय निर्णय घेणार हे आज पहावं लागणार आहे.