पुणे दिनांक २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) टी-२० वर्ल्डकप मध्ये भारताने इंग्लंड विरुद्ध दुसरा सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंड संघा समोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते.त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ हा १०३ धावांमध्ये बाद झाला आहे.आणी भारत तब्बल ६८ धावांनी जिंकला असून भारताकडून अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३ फलंदाज बाद केले आहे.आता भारतचा फायनल सामना दक्षिण आफ्रिकासोबत दिनांक २९ जून रोजी बार्बाडोस येथे हा सामना होईल