पुणे दिनांक २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील निंबुत गावात बैलगाडा शर्यतीचा बैल खरेदीच्या वादातून दुसऱ्याने एकावर गोळीबार केला आहे.यात एकजण गंभीर रित्या जखमी झाला आहे.तर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून यातील एक जण हा राजकीय पुढाऱ्यांचा मुलगा असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बारामती तालुक्यातील निंबुत गावातील गौतम काकडे यांनी जवळील फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा बैलगाडा शर्यतीमधील बैल खरेदी केला होता.दरम्यान हा खरेदी केलेला बैल पुन्हा निंबाळकर हे काकडे यांना मागत होते.मात्र यावरून दोघांत वाद झाला दरम्यान निंबाळकर हे काल काही लोक घेऊन काकडे यांच्या निंबुत गावात गेले असता व जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते.यावेळी गौतम काकडे व रणजित निंबाळकर यांच्यात वाद निर्माण झाला.आणि या वादातून गोळीबार झाला.सदरच्या गोळीबारात निंबाळकर हे जखमी झाले आहेत. दरम्यान या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 👮 गौरव काकडे व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि मुलगा गौतम काकडे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.