पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करुन पुणे पोलिसांच्या हप्तेखोरीचे रेट कार्ड उघड केले आहे. यावेळी हाऊस मध्ये बोलताना ते म्हणाले की.पुणे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीला पकडण्यात आल्यानंतर कारवाईला मोठ्या प्रमाणावर झालेल्या कारवाईला व विलंबास पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हेच जबाबदार आहे.
असे प्रश्ननं त्यांनी अधिवेशनात सदनात मांडले व त्यांच्या राजीनाम्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली केली.पुण्यात एकूण ४५० ओपन टेरेस हाॅटेल आहेत. प्रत्येक हाॅटेल कडून त्या भागातील कोरेगाव व कल्याणीनगर भागात पाच लाख रुपयांचा हाप्ता वसूल केला जातो.पब हे नियामाचे उल्लंघन करुन अनाधिकृत पब सुरू आहेत.यातील २७ पडला कुठलाही परवाना नव्हता.विना परवाना हे एकूण २७ पब चालत असतील तर पोलिस आयुक्त झोपा काढत होते का.? असं म्हणत त्यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कडून देण्यात आलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विधानसभेत सांगितले आहे.