पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर कुंडलीक खाडे यांना बीड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 अटक केली आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर बीड मध्ये एकच खळबळ उडाली होती.व संतप्त झालेल्या पंकाजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जालना रोडवरील खाडे यांचे ऑफिस फोडले होते.दरम्यान बीड -अहमदनगर रोड वरील जामखेड येथून पोलिसांनी खाडे याला अटक केली आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार पंकाजा मुंडे यांना धोका देत खाडे यांनी युतीचा धर्म असताना देखील तुतारीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे काम केले होते.व तशी एक खाडे यांची ऑडिओ किल्प मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती.यात या गोष्टीची कबुली देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते.दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीड मध्ये पोलिस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या गुन्हे दाखल झाले होते.तसेच याबाबत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे नेते वाल्मिक कराड यांनी कुंडलीक खाडे व शिवराज बांगर यांच्या विरोधात परळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता.त्या तक्रारी नंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खाडे यांना अटक केली आहे.