पुणे दिनांक २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलीक खाडे यांची शिवसेना पक्षातून आज हकालपट्टी करण्यात आली आहे.दरम्यान खाडे यांच्यावर पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवला आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवाराला मदत केल्याची नुकतीच एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती.यात कुंडलीक खाडे यांचे संभाषण होते.त्यामुळे बीडचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलीक खाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती.दरम्यान आज खाडे यांना एका जुन्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने अटक करण्यात आली आहे.असून त्यानंतर आज शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.