पुणे दिनांक २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असून विधान परिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एकमेकांना विधानपरिषदेत कामकाज सुरू असताना शिविगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दिनांक १ जुलै रोजी घडला होता.त्या नंतर आज मंगळवारी सकाळीच विधानभवनाच्या पाय-यांवर आमदार प्रसाद लाड हे आंदोलन करत आहेत.
दरम्यान या आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना बोलताना आमदार प्रसाद लाड हे म्हणाले की.ज्या पध्दतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माझ्या आई व बहिणीचा उच्चार केला हे चुकीचे आहे.विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायाला हवा.लोकप्रतिनिधी बद्दल जो शिव्या देतो . त्याबद्दल मला उध्दव ठाकरेंना देखील विचारायचे आहे.असं ते यावेळी म्हणाले.दरम्यान काल सोमवारी दिल्लीत अधिवेशनात काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूबाबत लोकसभेत कामकाजा वेळी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचे पडसाद मुंबईतील विधानपरिषदेत उमटले त्यावरुन दानवे व लाड यांच्यात सामना रंगून वाद झाला होता.