Home Breaking News अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनात महिलांचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर

अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनात महिलांचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर

41
0

पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध प्रश्नावर दुधाला आणि कांद्याला हमीभाव साठी आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.दरम्यान आज आंदोलनाला निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील सहभागी झाल्या असून निलेश लंके यांच्या जन आक्रोश आंदोलनात आज महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.

दरम्यान आज महिला ट्रॅक्टर मोर्चा घेऊन अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज थेट धडकल्या आहेत.आज अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत.यात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील स्वता ट्रॅक्टर चालवत महिलांसह ट्रॅक्टर मध्ये येत अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनस्थळी धडकल्या आहेत.दरम्यान मागील तीन दिवसांपासून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

Previous articleडोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत दोन स्फोट, कामगारांमध्ये एकच खळबळ
Next articleओडिसा मधील पुरीतील जगन्नाथ यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here