पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मोठी अपडेट हाती आली असून डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत दोन स्फोट झाले आहेत.त्यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सदरचा स्फोट हा एमआयडीसी मधील साईबाबा मंदिरा जवळ असणा-या कंपनीत स्फोट झाल्यानंतर कंपनीत आग 🔥 लागली आहे.व कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.आग लागल्यानंतर धुराचे लोट सर्वत्र पसरले होते.दरम्यान अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.दरम्यान या कंपनीत काही कामगार करीत असताना हा स्फोट झाला आहे.त्या मुळे अनेक कामगार हे कंपनीत अडकल्याची माहिती मिळत आहे.यापूर्वी देखील डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत 🔥 आग लागून अनेक कामगारांना आपले प्राण गमवावे लागले होते.तर अनेक कामगार हे गंभीररीत्य जखमी झाले होते.