पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुरत शहरात एक मोठी दुर्घटना घडली असून एक सहा मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एक महिला गंभीर रित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-या खाली अनेकजण अडकले असून यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटना स्थळी एनडीआरएफची टीम व अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेउन ढिगा-यांखालून सात जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.अजून अनेक लोक ढिगा-याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक कार्यरत आहे.यात अजून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान घटनास्थळी सुरतचे महापौर व आमदार दाखल झाले आहेत.या इमारतीचे बांधकाम हे सन २०१७ मध्ये झाले होते.सदरची इमारत कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर केवळ सात वर्षातच कोसळली आहे.यावरुन या इमारतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे.असे एकंदरीत स्पष्ट होत आहे.व आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.या इमारतीत शहरात वास्तव्यास असलेले कामगार या इमारतीत भाडेकरू म्हणून राहत होते. दरम्यान पोलिसांनी इमारत दुर्घटनेनंतर एफआयआर दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सुरत पोलिस करत आहेत.