Home Breaking News ‘छगन भुजबळांकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न ‘ तर गिरीश महाजन आंदोलन फोडतात, मनोज...

‘छगन भुजबळांकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न ‘ तर गिरीश महाजन आंदोलन फोडतात, मनोज जरांगे पाटील

137
0

पुणे दिनांक ११ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये शांतता रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.दरम्यान या रॅलीत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांच्या अंत पाहू नका.आमचं आरक्षण आम्हाला द्या.आम्हाला संरक्षण ओबीसीतून हवे आहे.छगन भुजबळ हे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.भुजबळांनीच ओबीसी -मराठा वाद निर्माण केला आहे.असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान बीडच्या रॅलीत बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की.गिरीश महाजन हे माणसाला फसवतात. ज्या ज्या आंदोलनात महाजन गेले.ते आंदोलन बंद पडले.गिरीश महाजन हे आंदोलन फोडतात.मी महाजन यांच्या पेक्षा हुशार आहे.मराठा बांधव व कुणबी एकत्रच आहेत.मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या.मागेल त्या मराठ्यांला आरक्षण द्या.  सरसकट आरक्षण हवे.मला ट्रकभरुन पैसे दिले तरी मागे हटणार नाही असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Previous articleकल्याण येथील ६३ एकर जमीन बिल्डरच्या घशात ७ हजार कोटींचा महाघोटाळा , विजय वडेट्टीवार यांचा महायुतीच्या सरकारवर गंभीर आरोप
Next articleविधान परिषदे आज निवडणूक,११ जागांवर यांच्यात लढत मुख्यमंत्री रात्रभर ताज लॅंड हाॅटेलमध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here