पुणे दिनांक १२ जुलै (पोलखोलननामा ऑनलाइन न्यूज टीम) विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे.तर विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे आज नेमका कुणाचा गेम होणार? याकडे सर्वाचे लक्ष असेल आज दिनांक १२ जुलै शुक्रवारी सकाळी ९ वाजल्या पासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान पार पडेल. त्यामुळे या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत हे प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होत आहे.१) भारतीय जनता पार्टीचे १) पंकजा मुंडे.२) योगेश टिळेकर ३) डॉ.परिणय फुके.४) अमित गोरखे.५) सदाभाऊ खोत . तसेच शिवसेना शिंदे गट १) कृपाल तुमाने २) भावना गवळी. तसेच राष्ट्रवादी ( अजित पवार) १) राजेश विटेकर व २) शिवाजी गर्जे .तर काॅग्रेस पक्ष.१) प्रज्ञा सातव व शेकाप १) जयंत पाटील तर उध्दव ठाकरे गटाचे १) मिलिंद नार्वेकर असे १२ उमेदवार रिंगणात आहेत.दरम्यान विधान परिषदेच्या ११ जागांवर आज मतदान होत आहे.याच पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून.भाजप व शिंदे गटाचे तसेच अजित पवार गटाचे सर्व उमेदवारांना वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये ठेवण्यात आले होते.यात शिंदे गटाचे आमदार हे ताज लॅंड हाॅटेलमध्ये ठेवण्यात आले होते.याठिकाणी स्वतः रात्रभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याचं लॅंड हाॅटेलमध्ये त्यांच्या आमदारांबरोबर मुक्कामाला होते.असे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांच्या बरोबर अजित पवार यांनी रात्री उशिरा हाॅटेल ललित मध्ये बैठक घेतली आहे.