पुणे दिनांक १४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे व मुंबईत तसेच कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात रात्रभर पाऊस कोसळत आहे.दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळत आहे.आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.तसेच मुंबई पुणे ठाणे. पालघर.रायगड . सिंधुदुर्ग.रत्नागिरी . सातारा.तसेच कोल्हापूर.या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तर मुंबई.पुणे.ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान या वेळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान आज सकाळपासून मुंबई व उपनगरात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे.याचा परीणाम रेल्वे लोकल व वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे.तर मुंबईत रविवारी मुसाळधार तर सोमवारी अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.दरम्यान आता सर्वत्र मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.आज सकाळ पासून पुण्यातील विविध भागात तसेच जिल्ह्यात व धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असल्याने पुण्यातील धरणांत पाणी साठ्यात वाढ होत आहे.