पुणे दिनांक १७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील शेतकरी वारकरी सुखी होऊ दे.व चांगला पाऊस पडू दे.तसेच बळीराजा सुखी -समाधानी राहू दे.असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.आषाढी एकादशी च्या निमित्ताने आज बुधवारी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल -रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे.सून वृषाली शिंदे.नातू रुद्रांश शिंदे.यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील बाळू अहिरे व आशाबाई अहिरे या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला.दरम्यान विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासमावेत रुक्मिणीच्या पूजेला गेले.त्यांच्या सोबत मानाचे वारकरी अहिरे दांपत्य देखील होते.रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक मुख्यमंत्री यांनी पूजा केली.प्रसाद म्हणून शिंदेंना यावेळी श्रीफळ.तुळशी हार आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देण्यात आली.बाळू अहिरे व आशाबाई अहिरे यांचा सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रातील वारकरी व शेतकरी सुखी होऊ दे.चांगला पाऊस पडू दे.पिक चांगलं येऊ दे.बळीराजाला सुखी – समाधानी राहू दे.असं साकडं आपण विठूरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की यंदा पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.मोठ्या संख्येने वारकरी बंधू -भगिणी हे दर्शनासाठी आले आहेत.राज्यातील कष्टकरी.शेतकरी आणि प्रत्येक घटकाला चांगले आणि सुगिचे दिवस येऊ दे.अशी प्रार्थना आपण विठुरायाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.