पुणे दिनांक १७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या मोठ्या राजकीय अपडेट नुसार पिंपरी -चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे शहरअध्यक्ष अजित गव्हाणे.तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे.यांच्यासह १५ पेक्षा जास्त नगरसेवक आज जेष्ठ नेते शरद पवारांसोबत येणार असल्याची माहिती मिळत आहे.आज सकाळी ११ वाजता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान पिंपरी -चिंचवड हा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो.परंतु आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदललं आहे. चिंचवड आणि भोसरी सद्य परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे.त्यामुळे विधानसभेसाठी देखील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला संधी पुन्हा मिळण्याची दाट शक्यता असल्याने अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता सतावत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.याच एका कारणामुळे अजित पवार यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते हे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाच्या वाटेवर असल्याचे एकंदरीत चित्र आहे.दरम्यान अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत.जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार विलासराव लांडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे.यांच्यासह भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नगरसेवक व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.तरी यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.