Home Breaking News पूजा खेडकरची फरार आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक

पूजा खेडकरची फरार आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक

244
0

पुणे दिनांक १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची फरार आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथील हिरकणवाडीतील एका हाॅटेल मधून पौड पोलिसांनी 👮 अटक केली आहे.आता तिला रायगड येथून ताब्यात घेऊन पुणे ग्रामीण पोलिस हे पुण्याला निघाले आहेत.

मनोरमा खेडकर यांच्यावर मावळ येथील शेतकऱ्यांना जमीनीच्या वादातून पिस्तूलचा धाक दाखवून धमकवल्या प्रकरणी शेतक-यांने पौड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.व त्यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यावर पोलिस गेले असता ती अधीच फरार झाली होती.दरम्यान तिच्या तपासा करीत पुणे ग्रामीण पोलिसांनी एकूण तीन टीम तैनात केल्या होत्या.दरम्यान मनोरमा खेडकर या रायगड जिल्ह्यातील महाड येथील हिरकणवाडीतील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापेमारी करून त्यांना अटक केली आहे.

Previous articleMBBS तरुणीची वैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या, पहिला प्रयत्न असफल दुसऱ्या प्रयत्नात खोल पाण्यात गेली वाहून
Next article‘१ तारखेआधी मी वसंत मोरेचा खून करणार ‘ , धमकीचा फोन ऑडिओ क्लिप व्हायरल भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here