पुणे दिनांक १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईसह उपनगरात व नवी मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.तर आज गुरुवारी पहाटे पासूनच पावसाला सुरुवात झाली आहे मध्ये रेल्वेची वाहतूक ही मुसाळधार पावसाने हार्बर रेल्वेला चांगलाच फटका बसला आहे.१० ते १५ मिनिटांनी रेल्वे उशिराने धावत आहे.लोकल सेवा विस्कळित झाली आहे.रेल्वे ट्रॅकवरुन पाणी वाहत आहे.त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था देखील कोलमडली आहे.तसेच सामान्य नागरिकांना कामांवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे.तसेच नाले ओसंडून वाहत आहे.कल्याण -डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला आहे.वेस्टर्न एक्स्प्रेसवेवर वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पावसामुळे मरीन ड्राईव्ह परीसरात देखील पाऊस कोसळत आहे.त्यामुळे याभागात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
दरम्यान महाराष्ट्रात काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.काही ठिकाणी या पावसाने शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे.तर कोकणातील रत्नागिरी.सिंधूदुर्ग.तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर व सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर कोकण येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबईसह ठाणे.पालघर.रायगड.व पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.