पुणे दिनांक १८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एमबीबीएस तरुणीने वैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.दरम्यान आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव ईशा बिंजवे (वय २४) असे नाव आहे.दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रम्हापुरी भागात राहणाऱ्या ईशाने काल संध्याकाळच्या सुमारास चंद्रपूर -गडचिरोलीच्या सीमे वरुन वाहना-या वैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.परंतू तिने प्रथम आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी मारली त्याठिकाणी पाणी कमी असल्याने ती प्रथम वाचली होती.पण नंतर तिने खोल पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली आहे.
दरम्यान तिने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह हा . पिंपळगाव जवळच्या नदी पात्रात मृतदेह आढळला आहे.दरम्यान या आत्महत्या प्रकरणी पोलिस तपास करत असून तिचे आई वडील हे दोघेजण होमिओपॅथी डॉक्टर असून ब्रम्हापुरी भागात त्यांचे रुग्णालय आहे. दरम्यान यावेळी पुलावरून जाणाऱ्या अनेकांनी सदर घटना मोबाईल मध्ये शुट केली आहे.याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे.मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.त्या ठिकाणी तिची चप्पल व सुक्टी उभी असलेली दिसली आहे . दरम्यान तिने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली याचा तपास आता पोलिस करत आहेत.