Home Breaking News ‘१ तारखेआधी मी वसंत मोरेचा खून करणार ‘ , धमकीचा फोन ऑडिओ...

‘१ तारखेआधी मी वसंत मोरेचा खून करणार ‘ , धमकीचा फोन ऑडिओ क्लिप व्हायरल भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

325
0

पुणे दिनांक १९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उध्दव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे व त्यांच्या भाच्याला धमकी देण्यात आली आहे.दरम्यान सदरची धमकी अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे दिली आहे.सदरच्या धमकी प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. धमकीची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या फिर्याद मध्ये म्हटले आहे की. मागील पंधरा दिवसांपासून मी माझ्या नियमित कामात व्यस्त होतो.मला माझ्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तींने फोन करून शिव्या द्यायला सुरुवात केली.मी त्याला कारण विचारले असता.त्यांने काही न सांगता शिव्या देणे सुरू ठेवले.नंतर मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याचा फोन कट केला.पंरतू तो पुन्हा फोनवर शिव्या देऊ लागला.”मी त्याचा नंबर ब्लाॅक केला.मग त्यांने दुसऱ्या नंबरवरुन फोन करून शिव्या द्यायला सुरुवात केली.मग मी माझा भाचा प्रतिक कोडितकर याला फोन करून सांगितले यांचा काय प्राॅब्लेम आहे.हे बघ त्यानंतर प्रतिकने त्याला फोन केला असता त्याला देखील शिविगाळ करण्यास सुरुवात केली.” असे फिर्यादीत म्हटले आहे.तसेच असे देखील म्हटले आहे की.’ येत्या एक तारखेच्या आधी मी वसंत मोरेंचा खून करणार अशी फोनवर धमकी दिली.व शिव्या दिल्या आहेत.दरम्यान राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अशा अनेक घटना घडत असतात. असा विचार करून मी याकडे दुर्लक्ष केले.परंतू सद्य स्थितीत सुरू असलेल्या घटना लक्षात घेता.ही गोष्ट गांभीर्याने घेणे मला म्हत्वाचे वाटले म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो की मला फोन करुन धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध आपण घ्यावा.असे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.” या सर्व प्रकरणामागे व मला जीवे मारण्याची धमकी द्यायला लावण्यामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा मला दाट संशय आहे.तरी मी आपणास नम्र विनंती करतो की मला फोन करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला व मनसे पुणे शहर‌अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी.अन्यथा रविवारी दिनांक २१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल याची आपण आपण नोंद घ्यावी.” असे म्हटले आहे.

Previous articleपूजा खेडकरची फरार आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक
Next articleमुंबईत मुसळधार पाऊस रेल्वेसेवेला फटका, काही ठिकाणी वाहतूक बंद लोकल १५ ते २०मिनिटांनी उशिरा धावतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here