पुणे दिनांक २० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नागपुर येथे आज सकाळपासून मुसाळधार पाऊसला सुरुवात झाली आहे.दरम्यान हवामान विभागाच्या वतीने नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.दमदार झालेल्या पावसामुळे अनेक सकल ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.दरम्यान शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसा मुळे व आज शनिवारी हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या अलर्ट मुळे या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.तसेच मुसळधार पावसाने उमरखेड येथील नदीला पूर आला आहे.या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान नागपूरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी आज मोठी घोषणा केली आहे.त्यांनी नागपूर येथील सर्व शाळा व कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.आज सकाळ पासूनच नागपूरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.तर नागपूर येथील काही जिल्ह्यांना आज मुसाळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.त्यामुळे घरात मधून बाहेर पडताना नागरिकांनी यांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.