Home Breaking News मुंबईत मुसळधार पाऊस रेल्वेसेवेला फटका, काही ठिकाणी वाहतूक बंद लोकल १५ ते...

मुंबईत मुसळधार पाऊस रेल्वेसेवेला फटका, काही ठिकाणी वाहतूक बंद लोकल १५ ते २०मिनिटांनी उशिरा धावतात

110
0

पुणे दिनांक २० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत सर्वत्र मुसाळधार पाऊसाने हजेरी लावली असून.या पावसाचा फटका रेल्वे लोकलला बसला आहे.मध्यरेल्वेची लोकलसेवा १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.दरम्यान रेल्वे विभागाच्या वतीने पाऊस व तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच अंधेरी व मालाड सबवे मध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.व नोकरीवर जाणाऱ्या कामगार व शालेय विद्यार्थी यांचे हाल होत आहेत.त्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली आहे.या आठवड्यात मुंबईकरांना पावसाने चांगलेच झोडपले आहे.दरम्यान आज देखील मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.व रेड अलर्ट हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे.आज मालाड व अंधेरीतील सबवेत अडीच फूट पाणी साचले आहे.याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. आज सकाळपासून मुसाळधार पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.याचा फटका लोकल सेवेला बसला आहे. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे.त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहेत.तसेच मुंबई उपनगरात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.पावसामुळे कल्याण व डोंबिवली मध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे.तसेच बदलापुरात जोरदार पाऊस कोसळत आहे.

Previous article‘१ तारखेआधी मी वसंत मोरेचा खून करणार ‘ , धमकीचा फोन ऑडिओ क्लिप व्हायरल भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
Next articleनागपुरात सकाळपासून मुसाळधार पाऊस.शाळा व काॅलेजला सुट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here